हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अंतर्गत प्रस्तावित बाबी

हळद लागवडीसाठी बियाणे निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हळदीची लागवड जेठे गड्डे, अंगठा गड्डा व रोपांच्या माध्यमातून करता येते. सद्यस्थितीत हळद उत्पादक शेतकरी जेठे गड्डयांचा वापर लागवडीसाठी करत आहेत. जेठे गड्डयांचा वापर केल्याने हळदीचे उत्पादन अंगठा गड्डा किंवा रोपे लागवड पद्धतीपेक्षा अधिक येत असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्पादनाव्यतिरिक्त सोऱ्या/कोचा हळदीतून देखील हळद उत्पादकांना अतिरिक्त उत्पादन मिळत आहे. राज्यात सोऱ्या/कोचा हळदीचे एक समांतर विपणन सुरु आहे व याचा वापर कुंकू निर्मिती तसेच कुरकुमीन काढण्यासाठी के ला जातो. तमिळनाडू कृषी विद्यापीठ व राज्यातील इतर कृषी विद्यापीठांनी हळद लागवडीकरिता एक डोळा कंद लागवड प्रो ट्रे पद्धतीने करण्याची शिफारस के ली आहे. तथापि या पद्धतीने लागवड केल्यास हळदीचे उत्पादन व कुरकुमीन प्रमाण कमी मिळत असल्याचे तसेच सोऱ्या/कोचा मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर हळद लागवडीकरिता ही पद्धत शिफारस करणे संयुक्तिक होणार नाही. राज्यात हळद पिकाच्या राजापुरी, गाढवी, पीडीके व्ही वायगाव, निजामाबादी, टेकु रपेटा, सेलम, कृ ष्णा या जातींची लागवड के ली जाते. तथापि इतर राज्यांतील उत्कृष्ठ, गुणवत्तापूर्ण, अधिक उत्पादन क्षमता असलेल्या विकसित (उदा.सगुणा, IISR प्रगती लाकाडोंग इत्यादी) जातींचे जिनोटाईप स्क्रिनींग करुन त्यांचा राज्यातील हवामानाशी अभ्यास करणे गरजेचे आहे.

इतर राज्यातील विविध संशोधन संस्थांनी विकसित के लेले वाण त्यातील विविध घटकांची माहिती ‘परिशिष्ट अ’मध्ये नमुद के ली आहे. हळद पीक लागवडीच्या अनुषंगाने पिकाच्या तसेच कु रकु मीन व ओलिओ रेझिन्सचे अधिक प्रमाण असलेल्या विविध वाणांची कृषी विद्यापीठांद्वारे राज्याच्या विविध विभागांमध्ये लागवडीद्वारे तुलनात्मक अभ्यास करुन त्यानुसार विभागवार वाणांची शिफारस करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सध्याच्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या प्रचलित वाणांचे खात्रीशीर बियाणे उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

सद्यस्थितीत हळद उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या घरच्या बियाणांचा वापर करतात. शेतकरी वर्षानुवर्षे घरचे बियाणे वापरत असल्याने हळद पिकात बियाणे बदलाचा दर हा अल्प आहे. कोणत्याही जातीची कार्यक्षमता ७५ टक्के ही तीच्या जनुकीय व २५ टक्के बाह्य घटकांवर अवलंबुन असते. एकाच वाणाच्या मातृकं दाची वर्षानुवर्ष एकाच वातावरणात लागवड केल्याने त्यावर तेथील हवामान, माती, पाणी यांसारख्या बाह्य घटकांचा परिणाम होऊन वाणाची उत्पादकता कमी होत जाते. ही बाब विचारात घेता हळदीच्या विविध वाणांचे अनुवंशीक गुणधर्मटिकवून ठेवणे, रोगमुक्त व गुणवत्तापूर्ण मातृकं द जतन करणे व ते रोप निर्मितीकरिता उपलब्ध करुन देणे. वाणातील अनुवंशीक गुणधर्म उदा. कीड रोग प्रतिकार क्षमता, उत्पादन क्षमता व इतर गुणधर्मांचा वापर करुन सुधारित वाण तयार करण्यासाठी वाणांची उपलब्धता करुन देण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ स्तरावर हळद बियाणे बँके ची स्थापना करणे प्रस्तावित आहे.

हळद बियाणे साठवणुकीमध्येबियाणे कं दातील पाण्याचा ऱ्हास होतो व त्यांची उगवणक्षमता कमी होत असल्याने बियाणे साठविण्यासाठी सुधारित बियाणे साठवणूक गृह उपलबध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांकडील बियाणे बदलाच्यादृष्टीने ठराविक कालावधीनंतर विद्यापीठ/संशोधन संस्थांनी गुणवत्तापूर्ण, अधिक उत्पादन क्षमता असलेले खात्रीशीर बेणे दृष्टीने शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांना उपलब्ध करुन देणे व सदर शेतकऱ्यांनीचेमार्फत हळद बेणे प्लॉट घेऊन त्यांचेद्वारे प्रमाणित हळद बेणे इतर शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करुन देणे ही बाब प्रस्तावित करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठ, शासकीय फळरोपवाटिका, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या मार्फत रोपवाटिका तयार करणे, त्यांचे प्रमाणिकरण करणे व त्याद्वारे विस्तृत प्रमाणावर लागवडीकरिता रोपांची उपलब्धता करुन देण्याच्या दृष्टीने रोपवाटिकांची स्थापना करण्याची गरज आहे.

हवामान व माती पोतानुसार वाणाचे मूलभूत गुणधर टिकवून ठेवणे, कीड-रोग विरहित बियाणे उपलब्ध करणे तसेच कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर रोप निर्मिती करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका स्थापन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत काही भागात ऊती संवर्धित प्रयोगशाळेत अधिक कुरकुमीन असलेल्या पिकाचा डोळा, पान, खोड, कंद यांसारख्या वनस्पतीच्या एखाद्या भागाद्वारे हळदीचे पुनरुत्पादन करुन कुरकुमीन निर्मिती करण्यात येते. अशा प्रकारचे कुरकुमीन उत्पादन करण्याचे खाजगी उद्योग सुरु झाले आहेत. यादृष्टीने ऊती संवर्धनाचा पर्याय तपासण्याकरिता राज्य स्तरावर एक ऊतिसंवर्धन प्रयोगशाळा स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. भाभा अणू संशोधन कें द्राने हळदीचे ऊतीसंवर्धनाद्वारे पुनरुत्पादन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. भाभा अणू संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठे यांच्या सामंजस्याने सदर ऊतीसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे.

जागतिक तसेच देशांतर्गत सेंद्रिय उत्पादनांना असणारी वाढती मागणी, त्यांना मिळणारे जादाचे दर व राज्यातील सेंद्रिय शेतीस असणारी अनुकू ल परिस्थिती विचारात घेता सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे प्रस्ता‍वित आहे. यासाठी सेंद्रिय हळद उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेच्या माध्यमातून हळद उत्पादन प्रमाणिकरण, ग्लोबल GAP प्रमाणिकरण, सेंद्रिय हळद लागवडीसाठी आर्थिक प्रोत्साहन देणे, कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी करणे, कृषी विद्यापीठामार्फत सेंद्रिय हळद आदर्श लागवड पद्धती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणे तसेच सेंद्रिय हळद लागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन व त्यानुषंगाने प्रशिक्षणांचे आयोजन करणे तसेच ऊत्पादनांस योग्य भाव मिळवून देणे.

राज्यातील जमीनीमध्ये नत्र कमी ते मध्यम, पालाश जास्त व कर्ब कमी प्रमाणात आढळून येते. राज्यात हळदीची लागवड कोकण व पूर्व विदर्भातील जां भा मृदेत, पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या वरकस मृदेत व मराठवाड्यातील काळ्या व भारी मृदेत केली जाते. हळद पिकास मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची आवश्यकता भासते. हळद उत्पादकांमध्ये लागवडीपूर्वी माती परीक्षण करुन घेण्याचा अभाव दिसून येतो. हळद लागवडीपूर्वी जमीनीचे माती परीक्षण व पाणी परीक्षण करुन घेणे आवश्यक आहे त्याकरिता हळद उत्पादक जिल्ह्यातील गावांचे सुपिकता निर्देशांक मृदा नकाशा तयार करण् याचे प्रस्तावित आहे.

एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस् थापन

हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने या पिकाच्या कंदवाढीसाठी जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण अधिक असणे आवश्यक आहे. जास्त उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी आवश्यक शेणखत, कंपोस्ट खताबाबत शिफारस करण् याची गरज आहे. तसेच विदर्भातील जमीनीत ह्या अल्कलीयुक्त कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने जमिनीत लोह, झिंक व बोरोन या सुक्ष्म मुलद्रव्याची कमतरता दिसून येते. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य (खत) व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

ICAR-भारतीय मसाले संशोधन संस्था, कोझिकोड यांनी आम्ल तसेच विम्ल जमीनींसाठी सुक्ष्मद्रव्यांच्या पुरवठ्याकरिता सूक्ष्मपोषण मिश्रण तयार केले आहे. तसेच, वसंतरा व नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बायोमिक्स तयार केले आहे. सदर Micronutrient Mix व बायोमिक्स यांच् या उपयुक्ततेबाबत अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी शिफारस करणे प्रस्तावित आहे. तसेच, माती परीक्षण व ऊती-पाने व देठ तपासणीच् या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठांनी शिफारशी करणे प्रस्तावित आहे.

जेणेकरुन अनावश्यक खतांचा वापर व पर्यायाने उत्पादन खर्च कमी होईल. याकरिता ऊती-पाने व देठ तपासणी प्रयोगशाळांची स्थापना करणे प्रस्तावित आहे. खतातील बचत व त्याच्या कार्यक्षम वापरासाठी फर्टिगेशनच्या माध्यमातून खत मात्रा देण्याच्या शिफारशी तयार करुन देण् याचे प्रस्तावित आहे.

हळद पिकाची लागवड पारंपारिक पद्धतीने सरी वरंब्यावर करण्यात येऊन पाट पाण्याच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. तथापि या पद्धतीत कंदाची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याने हळद पिकाची लागवड रुंद सरी व वरंबा पद्धतीने (गादी वाफा) करुन ठिबक सिंचनाचा वापर करणे, उपलब्ध पाण्याचा किफायतशीर व कार्यक्षम वापर होऊन उत्पादकतेमध्येवाढ करण्यासाठी ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढ होणे आवश्यक आहे.

सब सर्फे स सिंचन पद्धती

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आणि उच्च उत्पादनासाठी जमिनीतील उपलब्ध पाणी योग्य प्रमाणात राखणे, जमीनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी करणे, कमी जलधारण क्षमता आणि पाणी झिरपण्याचा वेग जास्त असलेल्या त्याचबरोबर जेथे भूपृष्ठीय सिंचन पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकत नाही आणि तुषार सिंचन महाग ठरते अशा जमिनीत सब सर्फेस सिंचन पद्धतीचा वापर करण्याबाबतचा अभ्यास करणे व या पद्धतीचा वापर फायदेशीर ठरल्यास त्याच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे प्रस्तावित आहे.

हळद लागवडीच्या दृष्टीने जमीन तयार करणे, पेरणी, भरणी, काढणी व प्रक्रियेकरिता मोठ्या प्रमाणावर यंत्राची आवश्यकता भासते. हळद उत्पादक शेतकरी हा अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी आहे. सद्यस्थितीत शेतामध्ये काम करणाऱ्या मजूरांची संख्या कमी झालेली आहे. वाढती मजूरी व वेळेवर मजूरांची अनुपलब्धता यामुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने लागवड, आंतरमशागत, काढणी इत्यादीसाठी अवजारेांचा वापर अनिवार्य झालेला आहे. तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी औषध फवारणी यंत्राचा वापरसुद्धा वाढत चाललेला आहे. या बाबींचा विचार शेत मजुरांची व बागायती शेतीमध्ये कामे योग्यवेळी व्हावी म्हणून ट्रॅक्टर चलीत हळद टोकण यंत्र, पावर टिलर आंतरमशागत व मातीची भर लावणारे यंत्र, फवारणी यंत्र, ड्रोन फवारणी यंत्र, पावर स्प्रेअर, हळद काढणी यंत्र तसेच बैल चलीत हळद काढणी यंत्र इत्यादी अवजारेांची अनुदानावर उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

वैयक्तिक पातळीवर हळद उत्पादकास सर्व अवजारे, यंत्रसामुग्री खरेदी करणे शक्य नसल्याने भाडेतत्वावर अवजारे केंद्र (कस्टम हायर सेंटर), सामुहिक सुविधा केंद्राच्या (कॉमन फॅसिलिटी सेंटर) माध्यमातून शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहायता गटाद्वारे अल्प व वाजवी दरात भाडे तत्वावर शेत अवजारे उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. भाडेतत्वावर अवजारे केंद्र (कस्टम हायर सेंटर), सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) यांच्याद्वारे उपलब्ध करुन द्यावयाच्या कृषी अवजारेांचा तपशील ‘परिशिष्ट ब’ मध्ये देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचे गट व शेतकरी उत्पादक संस्था/ कं पन्यांचा सहभाग घेणे

दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे, जमीन धारणा कमी होऊ लागली आहे. अल्प व अत्यल्प भूधारकांना यांत्रिकीकरण व इतर माध्यमातून शेती करणे अडचणीचे व खर्चिक होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे गट / बचत गट स्थापन करणे, त्यांचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था / कंपन्यांनांच्यामार्फत यांत्रिकीकरण, प्रक्रिया, स्पाईसेस पार्क, निर्यात इत्यादीसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणेचे प्रस्तावित आहे.

हळद पिकावर कंदमाशी या किडीचा तसेच कंदकुज व करपा या रोगांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळून येतो. कंदमाशी या किडीपासून २५ ते ३० टक्क्यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर हुमणी किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. कीड रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पीक संरक्षण योजना, तसेच इतर योजनांतील पीक संरक्षण घटकाच्या तरतुदीतून शेतकऱ्यांना अनुदानावर औषधे उपलब्ध करुन देणे. कीड रोग व नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा मिळवून देणे, कीड रोगांच्या व्यवस्थापनाकरिता ड्रोनचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. हळदीवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या फळपिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) मध्ये हळद पिकाचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. कंदमाशीच्या जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी कामगंध (फेरोमन) सापळे विकसित करणे प्रस्तावित आहे. कृषी विद्यापीठांद्वारे केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांचेकडून हळदीवरील विविध किडी व रोगांच्या व्यवस्थापनाकरिता लेबल क्लेम कीटकनाशके तसेच बुरशीनाशकांच्या शिफारशी मंजूर व प्राप्त करुन घेणे प्रस्तावित आहे.

हळदीची काढणी केल्यानंतर पारंपारिक पद्धतीत ती शिजवून, नैसर्गिकरित्या सुर्यप्रकाशात वाळवली जाते व तदनंतर तिला पॉलिश केले जाते. याकरिता हळद बॉयलर व पॉलिशर तसेच प्रतवारी मशिनची आवश्यकता भासते. शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर या बाबी घेणे खर्चिक आहेत. हळद प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनाला प्रोत्साहन देणे, साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, हळद काढणीनंतर यांत्रिक सुविधांची निर्मिती करणे यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी व स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून हळद उत्पादकांना भाडेतत्वावर अवजारे केंद्र (कस्टम हायरींग सेंटर) /कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) द्वारे भाडेतत्वावर वरील सुविधा उपलब्ध करुन देणे प्रस्तावित आहे.

हळद पिकाचे काढणीत्तोर व्यवस्थापन ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. पारंपारिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करुन तयार झालेल्या हळकुंड किंवा हळद पावडर मधील महत्त्वाचे उपयुक्त घटक कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (CFTRI) या संस्थेने हळदीच्या काढणी पश्चात व्यवस्थापनाकरिता नवीन प्रक्रिया संशोधीत करुन तिची शिफारस केली आहे. या पद्धतीत काढलेल्या हळदीच्या कंदापासून हळद पावडर तयार केली जाते. सुधारित पद्धतीत हळदीच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत प्रक्रिया करता लागणारे मजूर व आवश्यक इंधन यांची बचत होते. या प्रक्रियेत हळद कंदाचे काप तयार करुन ते आठ ते बारा तास ड्रायरमध्येवाळवले जातात. या प्रक्रियेमुळे हळदीचा सुगंध व स्वच्छता दोन्ही राखली जाते. प्रक्रियायुक्त हळदीत सूक्ष्मजीवांची संख्याही पूर्णत: कमी होत असल्याने केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (CFTRI) संस्थेने सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करण्याबाबत शिफारस केली आहे. पारंपारिक व सुधारित पद्धतीने हळद प्रक्रियेचा तुलनात्मक अभ्यास केला असता पुढील पानावरील तक्त्याप्रमाणे सुधारित पद्धत सरस असल्याचे दिसून येत असल्याने या पद्धतीचा अवलंब करुन प्रक्रिया करण्याबाबत शिफारस करणे आवश्यक आहे. याबाबत CFTRI संस्थेने हळद प्रक्रियेकरिता सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार कॉमन फॅसिलिटी सेंटर स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, द्वारा विकसित संसाधन कार्यक्षम हळद प्रक्रिया (Resource Efficient Turmeric Process (RETP) युनिट

पारंपारिक हळद प्रक्रिया ही वेळखाऊ, श्रम-केंद्रित आणि त्यामध्ये अस्वच्छता राहण्याची जास्त शक्यता असते. ही बाब विचारात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, यांनी संसाधन कार्यक्षम हळद प्रक्रिया तंत्र विकसित केलेले आहे. या पद्धतीमध्ये हळद स्वच्छ करणे, कंदाचे काप करणे, हवा विरहीत यंत्रामध्ये हळद शिजवणे, वाळविणे व पावडर करुन पॅकिंग करणे या बाबींचा समावेश आहे. या प्रक्रीयेमुळे कच्ची हळदीपासून पावडर हळद दोन दिवसात मिळवता येते, कमी श्रम व वेळेची बचत होते. हळदीचा दर्जा व गुणवता सुधारली जाते तसेच यामध्ये स्वच्छता व कु रकु मीनचे प्रमाण जास्त राखले जात असल्यामुळे हळदीस जादा दर मिळू शकतो. ही बाब विचारात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, यांचेद्वारे विकसित हळद प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्याच्या उपयुक्ततेनुसार वापर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

हळदीस बाजारात दर कमी असताना ती साठवण्याकरिता साठवणूकगृहांची तसेच शीतगृहांची उपलब्धता केल्यास जास्त दराच्या वेळी हळद विक्री करुन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होऊ शकेल. त्याकरिता साठवणूकगृह व शीतगृहांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. उद्योग विभागामार्फत हळद प्रक्रीयेसाठी जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या संदर्भात स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, स्टार्टअप यासारख्या वर्गांचा प्राधान्यक्रम ठरवून हळद उद्योगासाठी काही विशेष सवलती उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

हळद काढणीत्तोर प्रक्रिया : पारंपारिक पद्धत व सुधारित CFTRI पद्धतीचा तुलनात्मक तपशील

पाणी ८ + ०.०९ ८ + ०.०२
सुगंधी (बाष्पशील) तेल (Volatile Oil) ३.७ + ०.००५ ४.३ + ०.००४
कर्सक्यूमिन २.८ + ०.००१ ३.५ + ०.००२
कुल राख सामग्री ५.८ + ०.००५ ५.५ + ०.०२
अम्लस अनुमूलित राख सामग्री १.५ + ०.२ १.५ + ०.२
शर्करा ५५ + ०.०२ ५५ + ०.००४
क्रोमेट चाचणी निगेटिव्ह निगेटिव्ह
कॉलिफॉर्म फॉर्म्स (cfu/g) ६ + ०.२ निरंक
यीस्ट व मोल्ड १५ + ०.५ निरंक
१० टोटल प्लेट काउंट ८५ + १.० निरंक
११ अल्फाटॉक्सिनचे प्रमाण निरंक निरंक

हळदीचे राज्यातील, देशातील व देशाबाहेरील बाजारपेठ हे खूप मोठे आहे. सध्याच्या कोविड- १९ या जागतिक महामारीमुळे लोकांच्या जीवनमान, सवयींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. लोकांमध्ये आरोग्याप्रती जागरुकता निर्माण झालेली आहे. हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म तसेच हळदीचा सौदर्य प्रसाधने व खाद्य उद्योगात मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर विचारात घेता विविध उद्योगांमध्ये हळदीस असलेला वाव, बाजारपेठांचा शोध घेणे, बाजारात किती व कोणत्या गुणवत्तेच्या हळदीस असलेली मागणी यादृष्टीने बाजारामध्ये माल पाठविणेसाठी नियोजन करणे इत्यादी बाबींच्या अभ्यासाकरिता Market intelligence Cell स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. हळदी पासून शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळण्याच्या दृष्टीने बाजार कायद्यांमध्ये सुधारणा करुन खरेदी- प्रक्रिया- शितगृह साठवणूक (कोल्ड स्टोरेज) या सुविधा सामुहिक सुविधा कें द्राच्या माध्यमातून एकत्रितपणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. भाभा अणू संशोधन केंद्र यांच्यामार्फत विविध कृषी उत्पादितांची साठवणूकीमधील टिकाऊ क्षमता वाढविण्याचे दृष्टीने विकिरण तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. या तंज्ञज्ञानाद्वारे किरणोत्सर्जनाच्या मार्फत कूजणे किंवा किडण्यास करणीभूत सूक्ष्मजीव आणि कीटकांची पुनरुत्पादन क्षमता कमजोर करुन उत्पादन टिकण्याचा कालावधी वाढवणे शक्य होते. साठवणूकीमध्ये हळद कंद /हळकुं ड दिर्घकाळ टिकण्यासाठी साठवणूक गृहांच्याबरोबरीने विकिरण सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

ई-मार्केटींग

ईलेक्ट्रॉनिक ट्रेडींग मध्ये नॅशनल कमॉडिटी एक्सचेंज वर हळदीचा देखील व्यापार होतो. हा व्यापार शेतकरी उत्पादक कंपनी करु शकते. तथापि अद्यापही हळद उत्पादक शेतकरी व कंपनी या बाजारात उतरले नाहीत. हळद उत्पादकांचे मार्केटींग संदर्भात क्षमता बांधणी करणे प्रस्तावित आहे. गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हळदीचे विपणन केल्यास मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांस अधिक भाव मिळू शकेल.

भौगोलिक चिन्हांकन (मानांकन)

सध्या हळदीस वायगाव (वर्धा)- हळद व सांगली- हळद या नावाने The Geographical Indication (Registration & Protection) of Goods Act 1988 अंतर्गत भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालय, चेन्नई यांचेकडून भौगोलिक चिन्हांकनाचा दर्जा प्राप्त आहे. हिंगोली हळदीसाठी नवीन जीआय नोंदणीसाठी असलेला वाव विचारात घेऊन तेथील कोचा हळदीस भौगोलिक मानांकन घेण्याचे प्रस्तावित आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त हळदीचे अधिकृ त वापरकर्तेवाढविणे, हळद उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करणे व त्यांचेद्वारे ट्रेसिबीलिटी नेटद्वारे हळद क्षेत्राची नोंदणी करणे याकरिता पणन व अपेडा मार्फत निर्यात वृद्धीला चालना देण्याचे प्रस्ता‍वित आहे. जेणेकरुन भौगोलिक चिन्हांकनाच्या वापरामुळे निर्यातीमध्ये अधिकृ त वापरकर्ता शेतकऱ्यांना अधिक प्रिमियम किं मत मिळण्यास मदत होईल. प्रक्रिया आणि निर्यातीच्या दृष्टीने गुणवत्ता आणि सुरक्षा हमीसाठी शेत नोंदणीकरिता हळदीच्या स्वतंत्र टर्मरिक ट्रेसिबिलिटी प्रणालीची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.

पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग

सध्याच्या काळात ग्राहक आरोग्याबाबत जागरुक झालेले आहेत. यामुळे सद्यस्थितीत लेबल के लेल्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. तसेच, सद्यस्थितीत ग्राहकाची गरज, आवड लक्षात घेऊन शेतमाल पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण करावयाची असल्यास शेतकऱ्यांनी / उत्पादकांनी शेतमालाचे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. ब्रँडिंगमुळे उत्पादनास ओळख मिळते, व्यवसाय मूल्य वाढते, बाजारपेठे त / ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो व ब्रँडिंग नवीन ग्राहक निर्माण करते /आकर्षित करते. हे विचारात घेता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांचेमार्फत हळद उत्पादनांच्या बाजार विकासाकरिता सुयोग्य पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, बारकोड, वेबसाइट विकास इत्यादी बाबत हळद उत्पादकांना मार्गदर्शन व निधी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. विपणन सुरक्षा हमीसाठी कीटकनाशक अवशेष, कुरकुमीन प्रमाण, जड धातू, सूक्ष्मजीव, पोषकतत्व आणि इतर घटकांसाठी गुणवत्ता चाचणी सुविधेची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे.

क्लस्टर फॅसिलिटेशन सेल

राज्याचे कृषी निर्यात धोरण जाहीर झाले आहे. या धोरणांतर्गत वाशिम, यवतमाळ, सांगली, परभणी, सातारा, वर्धा, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी- हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ गठीत करण्यात आलेला आहे. सदर सेलच्या माध्यमातून हळद उत्पादनाची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. त्याचबरोबर ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत हिंगोली,नांदेड, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांकरिता मसाले पिकांचा समावेश करण्यात आलेला असून त्याद्वारे हळद उत्पादनास सामुहिक स्तरावर उत्तेजन देण्यात येईल. हळद पिकासाठी क्लस्टर स्वरुपात जास्तीत जास्त घटक राबविणे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांचे मार्फत सामूहिक सुविधा केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

कुरकुमीन घटक चाचणी यंत्रणा

राज्यात सांगली, वसमत, हिंगोली, नांदेड, रिसोड, कुरंडा (वसमत), मुंबई, जिंतूर, भोकर, सेनगाव जावळा- बाजार या प्रमुख बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक जास्त प्रमाणात होते. या बाजार समित्यामध्ये जर जलद कु रकु मीन घटक चाचणी यंत्रणा उपलब्ध करुन दिल्यास या बाजार समित्यांमध्ये प्रक्रियादारांना कुरकुमीन टक्केवारीच्या आधारे हळदीची खरेदी करणेस मदत होईल तसेच शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळणेस मदत होईल. हे विचारात घेता पुढील ५ वर्षात १२ बाजार समित्यांमध्ये जलद कुरकुमीन घटक चाचणी यंत्रणा बसविणेचे प्रस्तावित करणेत येत आहे.

निर्यात प्रशिक्षण

पणन मंडळामार्फत कृषी मालाच्या निर्यात विषयी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतो. त्याच धर्तीवर हळदीच्या निर्यात विषयी पणन व भारतीय मसाला पिके महामंडळ यांच्या मार्फत स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे प्रस्ता‍वित करण्यात येत आहे. यामध्ये हळद निर्यातीकरिता आवश्यक सर्व प्रकारची माहिती तज्ञांमार्फत प्रशिणार्थींना देण्यात येईल.

खरेदी- विक्रेता संमेलन

राज्यातील हळद उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी तसेच हळद प्रक्रियादार यांच्या उत्पादनास कायमस्वरुपी खरेदीदार मिळण्याकरिता दरवर्षी नियमितपणे खरेदी विक्रेता संमेलन आयोजित करणे प्रस्तावित आहे. अशा उपक्रमामुळे एकाच छताखाली उत्पादक व खरेदीदार, निर्यातदार आल्यामुळे सर्वांना लाभदायक ठरेल. तसेच भौगोलिक मानांकन मिळालेल्या उत्पादनास खरेदीदार मिळण्यास मदत होईल. केंद्र शासनाच्या मसाले मंडळ तसेच अपेडा अशा विविध संस्थांच्या माध्यमातून खरेदी- विक्रेता संमेलनांचे आयोजन करणे. हळद निर्यातीकरिता विविध देशांकडू न विशिष्ठ गुणवत्तेच्या व मानकांच्या हळदीची मागणी असते त्याचा संक्षिप्त तपशील ‘परिशिष्ट- ड’ मध्ये देण्यात आलेला आहे. हळद निर्यातवृद्धीच्या विविध देशांची मागणी, त्याची मानके इत्यादी बाबत हळद उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे प्रस्तावित आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात जाहिरात/प्रदर्शनात सहभाग

राज्यातील हळद उत्पादकांना तसेच हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योजक यांना, त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळण्याकरिता त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीच्या उत्पादनांबाबतची माहिती त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये कसा बदल करणे आवश्यक आहे याची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता हळद उत्पादकांना तसेच हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योजक यांना आंतरराष्ट्रीय बाजारात जाहिरात/ प्रदर्शनात सहभागाकरिता पणन मंडळामार्फत प्रोत्साहन देण्यात येईल.

अ.
क्र.
बाब मूल्य साखळीतील
भागधारक
सरासरी विक्री किंमत शेरा
रु/कि.ग्रॅं डॉलर ($)/कि.ग्रॅं
ओली हळद केंद शेतकरी ०.१ भारत, इथिओपिया, टांझानिया,
व्हिएतनाम प्रमुख उत्पादक देश
प्राथमिक प्रक्रिया शेतकरी/ संकलक ५० ०.६७ उन्हात वाळवणे प्रक्रिया
हळद पॉलिशिंग व पावडर
तयार करणे
उद्योजक ८० १.०७ सुक्ष्म व लघु उद्योग
पावडरची छोटा किरकोळ
पाऊच मध्ये F.M.C.G बाजारात
विक्री
संस्थात्मक
मूल्यसाखळी व
उद्योजक
१५० सुक्ष्म व लघु उद्योग व पुरवठा साखळी
यांदार उत्पादक ते ग्राहक साखळी
पूर्ण होते.
कुरकुमीन व ओलिओ रेझिन्स मध्यम व मोठे उद्योग ६००० ८० उच्च मूल्यवर्धन
कुरकुमीन कॅप्सूल (गोळ्या) मध्यम व मोठे उद्योग ४५.००/ कॅप्सूल ०.६/ कॅप्सूल अंतिम उत्पादन

हळद मूल्य साखळी विकास

मूल्य साखळी ही वस्तूंचे उत्पादन, खरेदी आणि विक्रीचे जग कसे कार्य करते हे समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आपण सर्व एक प्रकारे मूल्य शृंखलेचा एक भाग आहोत- उदा. उत्पादक, प्रक्रियादार, किरकोळ विक्रेते, वित्त पुरवठादार वस्तू आणि सेवांचे ग्राहक इ. ग्राहक म्हणून आपण सर्व उत्पादनांचा अंतिम वापर करत असल्यामुळे आपण अनेकांशी जोडलेले आहोत. कृषी मूल्य साखळीच्या एका टोकाला उत्पादक शेतकरी आहेत जे पीक घेतात आणि दसऱ्या टोकाला ग्राहक आहेत जे अंतिम उत्पादन वापरतात तर मध्यभागी अनेक हजारो स्त्री-पुरुष आणि लहान-मोठे व्यवसाय आहेत. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यवसाय साखळीतील एक छोटासा टप्पा पार पाडतो आणि प्रत्येक मार्गाने मूल्य वाढवतो.

मूल्य साखळीमध्ये उत्पादन, खरेदी, विक्री, प्रक्रिया, वाहतूक, साठवण, तपासणी आणि पॅके जिंग यामध्ये उत्पादक आणि इतर व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका असते. बँका कर्ज देतात, सरकार कायदे आणि धोरणे प्रस्थापित करते आणि कृषी संशोधन संस्था शेतकऱ्यांना मूल्य शृंखलेत अधिक यशस्वीपणे सहभागी होण्याचे मार्ग विकसित करतात. वरील तक्त्याद्वारे, जर आपण हळदीच्या मूल्य साखळीचे महत्त्व समजून घेतले आणि त्याचा अभ्यास के ला तर आपण खालील बाबी स्पष्ट होतात.

  1. जर रु. ८.०० प्रति किलो किंवा ०.१० $ दरानुसार कच्च्या मालाची मूल्य साखळी तयार के ली तर त्यापासून आपण रु. ६००० किंवा ८० $ (प्रति किलो) मिळू शकतो.
  2. मूल्य साखळीद्वारे जागतिक बाजारासाठी आवश्यक ट्रेसिबिलिटी सहज राखता येते.
  3. मूल्य साखळीतील सर्व भागधारकांनी एकत्रित काम केल्यास प्रत्येक भागधारक चांगला परतावा मिळवू शकतो.
  4. सर्व भागधारक एकमेकांशी जोडलेले असल्याने कोणतीही वित्तीय संस्था या मूल्य साखळीतील कोणत्याही भागधारकाला सहज वित्तपुरवठा करू शकते.
  5. शेतकरी सक्षमीकरणासाठी व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) प्रकल्पाद्वारे कं पन्यांच्या नफ्याचे पुनर्नियोजन करणे सहज शक्य होऊ शकते.
  6. मूल्य साखळीतील सर्व भागधारक सहजपणे चांगले उत्पादन घेऊ शकतात.
  7. प्रत्येक भागधारक हा खरेदीदार आणि पुरवठादार असतो.
  8. या संकल्पनेद्वारे शेतकऱ्याला ग्राहकाशी जोडणे आणि त्यास आधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थापन तत्त्वे आणि विपणन साधनांची अद्ययावत माहिती मिळू शकणार असल्याने शेतकरी आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी मूल्य साखळी उपयुक्त ठरु शकेल.

वरील पार्श्वभुमीवर हळद उद्योगाशी संबंधित सर्व भागधारकांच्या समन्वयाने हळद मूल्य साखळी विकसित करणे प्रस्तावित आहे.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या फळपिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) मध्ये हळद पिकाचा समावेश करुन मोबाईल ॲपद्वारे हळद पिकावरील कीड रोगांची माहिती संकलीत करणे, कीड रोगांच्या तीव्रतेनुसार शेतकऱ्यांना पीक संरक्षण सल्ला देणे, कीड रोगांचे पूर्वानुमान करणारी ICT आधारित माहिती तंत्रज्ञान सुविधा तयार करणे, हळद उत्पादन, हवामान, खत प्रमाण, बाजारभाव इत्यादी संदर्भात सल्ल्याकरिता मोबाईल ॲप (कृषीक ॲप) चा वापर करणे, भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System) चा वापर करुन हळद पिकावर येणारे संभाव्य कीड रोग या विषयी शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक सल्ला देणे, हळद वेब पोर्टल आणि ॲन्ड्राईड ॲप विकसित करणे, विविध भागधारक उदा. शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, निर्यातदार, लघू व मध्यम उद्योग (SME) युनिट्स इत्यादींसाठी ऑनलाइन वेबिनार/ प्रशिक्षण सुविधा तयार करणे, महाराष्ट्रातील मसाला पिकांसाठी नियंत्रित व काटेकोर शेती (प्रीसिजन फार्मिंग) प्लॅटफॉर्म तयार करणे, शासनाच्या विविध उपक्रमांबाबत सोशल मीडियाद्वारे जनजागृती करणे, हळद उत्पादन, प्रक्रिया, निर्यात इत्यादी विविध उपक्रमांवरील माहितीपट, यशोगाथा तयार करणे, हळदीसाठी इतर सरकारी योजनांशी सांगड घालण्याच्या दृष्टीने आयटी आधारित सुविधा तयार करणे तसेच आवश्यकतेनुसार इतर आयटी उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

लाकडाचा भुसा, पिवळ्या मक्याचे पीठ, लीड क्रोमेट, मेटानिल यलो, झांथियामम इ. चा वापर करुन कृत्रिम हळद तयार करण्यात येते. कृत्रिम हळदीच्या वापराने आरोग्यावर दष्पु रिणाम होत असून पाण्याचे प्रदषुण तसेच कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने कृत्रिम रंग वापराची प्रमाणके सुधारित करणे प्रस्तावित आहे. तसेच हळद भेसळ रोखण्याकरिता लाकडाच्या भुशापासून हळद तयार करणारे कारखाने बंद करण्यासाठी कायदा करण्याचे प्रस्तावित आहे. हळदीतील भेसळ रोखण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांशिवाय स्वतंत्र व ठोस कायदे करणे प्रस्तावित आहे. हळदीचा भंडारा म्हणून जास्त वापर होत असल्याने राज्याचे रंगाचे धोरण ठरविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

सध्या स्वत: शेतकऱ्यांद्वारे ओली हळद शिजवून वाळविली जाते. यास प्रक्रिया समजून हळदीची गणना शेतीमाल न करता राज्य सरकारकडून त्यावर ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारणी के ली जात आहे. हळद व्यापारात अडतदारांकडू न घेतल्या जात असलेल्या दलालीवरही ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जात आहे. जीएसटी आकारणीच्या या निर्णयामुळे हळद खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदीदार पुढे येत नाहीत व हळदीला अधिक चांगला दर मिळत नाही. राज्य सरकारकडून आकारल्या जात असलेल्या जीएसटीमुळे कर वाचविण्यासाठी शेतकरी राज्याबाहेर हळद विक्री करण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील हळद बाजारकेंद्र व पर्यायाने हळदीच्या एकू ण उलाढालीवर मोठा परिणाम होणाची शक्यता आहे. शेतमाल शेतातून काढल्यानंतर बाजारापर्यंत पाठवितानाच्या सामान्य प्रक्रियेमुळे त्या वस्तुचे मुळ गुणधर्म बदलत नसतील तर तो शेतमाल व्याख्येतच गृहीत धरण्याबाबत केंद्र शासन, वित्त मंत्रालय (महसूल विभाग) अधिसूचना क्रमांक १२/२०१७- कें द्रीय कर (दर) दि. २८ जून २०१७ अन्वये सुचीत के लेले आहे.

हळद कंद पिकविल्यानंतर शेतकरी स्वत: कं द शिजवून, वाळवून बाजारात विक्रिसाठी आणतात. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारद्वारा आकारणी के ली जात असलेला ५ टक्के वस्तूव सेवा कर रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. वस्तूव सेवा कराची अडचण दर करण्याच्यादृष्टिकोनातून ओली हळद विक्रीकरिता बाजार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

हळद पिकास २५ टक्के सावली चांगलीच मानवते, त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. महाराष्ट्रातील लागवडीखालील नवीन फळबागांमध्ये व वानिकी पद्धतीमध्ये हळद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करुन हळद क्षेत्र विस्तारासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. वेगवेगळ्या रोगांप्रति प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीस अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. मानवाच्या रोजच्या आहारात हळदीचा वापर झाल्यास लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू न साथीच्या रोगांस अटकाव होण्यास मदत होईल.

त्यासाठी हळदीचा जीवनावश्यक वस्तूम्हणून किमान आधारभूत किमतीमध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. हळदीस किमान आधारभूत किं मत मिळाल्यास क्षेत्र विस्ताराद्वारे हळद उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकेल.

सुधारित पद्धतीने हळद लागवड, हळद गटशेती, सेंद्रिय हळद लागवड, सेंद्रिय हळद उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करणे, पीक संरक्षण, पीक प्रात्यक्षिके , शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा इत्यादीद्वारे हळदीखालील क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी कार्यक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

हळद महोत्सव

हळदीमध्ये असलेले कर्करोग विरोधी, दाहक विरोधी, जंतूनाशक, अँटीऑक्सिडेंट तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणे बाबच्या गुणधर्मामुळे हळदीचा वापर वाढला आहे. हळदीचे विविध गुणधर्मव उपयुक्ततेबाबतचा तपशील “परिशिष्ट- इ” मध्ये देण्यात आलेला आहे. हळदीच्या या गुणधर्माबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी हळद महोत्सवाचे आयोजन करणे प्रस्तावित आहे.

हळद कार्यशाळा

हळद पीक उद्योगाशी संबंधित सध्याच्या तसेच भविष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित संस्थांच्या हळद कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

हळद स्टिवर्डशिप काँसिल मॉडेल

हळद पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील मुख्य भागधारकांना सहभागी करून घेणे. हळद मूल्य साखळी विकसित करणे, शासकीय सहाय्य सुलभ करणे आणि वित्तपुरवठा सुलभतेने होण्यासाठी विविध संस्थात्मक यंत्रणांना प्रोत्साहन देणे, पारंपारिक ज्ञानासह नवकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकासास प्रोत्साहन देणे, विविध बाजारपेठा मिळविणे, हळद उत्पादनांची प्रचार प्रसिद्धी सारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे, कृषी मूल्य साखळीतील सर्व भागधारकांना जोडणे इ. बाबी लक्षात घेऊन स्टिवर्डशिप काँसिल या संकल्पनेवर आधारित हळद संस्था स्थापना करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

हळद बागायतदार संघ

विविध पिकांच्या बागायतदार संघांप्रमाणे हळद पिकासाठी राज्यस्तरीय एक हळद बागायतदार संघ स्थापन होणे आवश्यक आहे. हळद उत्पादकांच्या हितासाठी हळद बागायतदार संघाच्या माध्यमातून हळद उत्पादक, प्रक्रियादार, खरेदीदार, निर्यातदार, संशोधक, शासकीय यंत्रणा इत्यादी भागधारकांमध्ये समन्वय साधून हळद संदर्भांत समस्यांवर हळद बागायतदार संघ काम करेल. हळद मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये विविधतेला प्रोत्साहन देणे, प्रदेश विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे मूल्यमापन करणे, हळदीच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या प्रमुख जैविक आणि अजैविक घटकांचे निराकरण करण्यासाठी मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन हाती घेणे याकरिता हळद बागायतदार संघ ही स्वतंत्र यंत्रणा काम करेल. त्याचबरोबर, विविध शासकीय विभागांद्वारे हळद पीक लागवड, काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान, निर्यात, प्रक्रिया, ब्रँडींग, पॅके जिंग, विपणन इत्यादी करिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणेच्या दृष्टीने सदर संघाच्या माध्यमातून पाठपुरावा करता येईल.

महिला शेतकरी सक्षमीकरण व प्रशिक्षण, शेतमजूर आणि शेतकरी कल्याण

हळद लागवडीकरिता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. हळद लावणे, भरणी करणे, काढणी, प्रक्रिया इ. मध्ये महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हळद उत्पादन निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणेचे दृष्टीने महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. याकरिता महिलांसाठी हळद उत्पादनाबाबत प्रशिक्षणांचे आयोजन करणे, महिला बचत गटाद्वारे हळदीचे पदार्थ तयार करणे व विक्रीबाबत त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. शेतमजुरांसाठी आधुनिक अवजारांची उपलब्धता तसेच अवजारे, किटकनाशक सुरक्षित हाताळणी याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकू ल परीस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यास विमा संरक्षण उपलब्ध असणे गरजेचे आहे. जेणेकरुन पिकाच्या नुकसानीच्या परीस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहू शके ल. सध्या नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या परीस्थितीमुळे हळद पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास केंद्र शासनाचे दि. ०८ एप्रिल, २०१५ चे सुधारित राज्य आपत्ती निवारण दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल निकषानुसार नुसार प्रति हेक्टरी रु. १३५००/- व किमान रु. १०००/- देय आहे. यानुसार प्रति शेतकरी कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत मदत देण्यात येते. तथापि, हळद पिकाचा सध्या पीक विमा योजनेत समावेश नसल्याने शेतकऱ्यास विमा संरक्षण मिळत नाही त्यामुळे हळद पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याचे प्रस्तावित आहे.

हळद पिकाचे बेणे, लागवड, प्रक्रिया यासाठी मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांमार्फत वेळेवर व नियमित वित्त पुरवठा होणे गरजेचे आहे. त्याकरिता किसान क्रेडीट कार्ड, बिनव्याजी भांडवल तसेच पतहमी सुलभतेने मिळण्याकरिता जिल्हास्तरावरुन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्व वित्तीय संस्थांच्या समितीद्वारे सुलभतेने वित्त पुरवठ्याचे नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

हळद उत्पादन व त्यासंबंधित उद्योगासाठी केंद्र / राज्य तसेच जागतिक बँक सहाय्यीत योजनांद्वारे प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या बाबींसाठी योजनांतील निधी अपुरा पडत असेल त्या बाबींकरिता शासनाकडू न स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करुन घेण्याचे प्रस्तावित आहे. विविध योजनांतर्गत निधीचा तपशील ‘परिशिष्ट- क’मध्ये देण्यात आला आहे.