अध्यक्षीय मनोगत
हळद धोरणाच्या माध्यमातून राज्यातील हळदीला देशासह जगात नावलौकिक मिळेल
हळद प्रक्रिया, हळद विपणन, ब्रॅंडिंग इ. बाबत शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान, कौशल्य असणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे हळद धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझ्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती गठीत केली होती. सुमारे दोन वर्षे या समितीने सुमारे १५ बैठका घेऊन हळद विषयासंदर्भात सखोल अभ्यास के ला. आणि त्यातून समाजातील सर्व स्तरातील घटकांना उपयोगी पडेल असे आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारे धोरण मी आज आपल्या समोर मांडत आहे. हळद धोरणाच्या माध्यमातून हळद उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, पिकाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाव्यात, महाराष्ट्रातील हळदीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याचा तपशील याठिकाणी मांडला गेला आहे.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हळदीचे विक्रमी उत्पादन होत आहे, मात्र या धोरणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विपणन व्यवस्था याबद्दल शेतकरी तसेच व्यापारी यांना माहिती मिळेल आणि आपले उत्पादन देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी प्रगतिशील आहे. हळद मा. खा. हेमंत पाटील अध्यक्ष, हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समिती धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शेतकरी आणि सर्व भागधारकांच्या मागे खंबीरपणे उभा आहे.
हळद धोरणामध्ये पारंपरिक धोरणासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. शेतीमध्ये उत्पादित के लेला शेतमाल टिकवण्यासाठी कृषी जैव तंत्रज्ञान वि भाग, भा भा अणुसंशोधन कें द्रामार्फत प्रयोगशाळा उ भारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना हळद बियाणे, खते, पाणी, कृषी उपकरणे, हळद, हळदीतील प्रमुख घटक चाचणीसाठी आवश्यक यांत्रिकीकरण, बॉयलर आणि पॉलिशर उपकरणांचे योग्य नियोजन करणे, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती पाणी परीक्षण केंद्र इत्यादींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वंकष हळद धोरण येणाऱ्या काळात हळद पिकासाठी वरदान ठरेल आणि राज्यातील हळदीला देशासह जगात नावलौकिक मिळवून देईल.
महाराष्ट्र राज्याचे हळद धोरण तयार करण्याकरिता आपला वेळ देणाऱ्या आणि बहुमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या समितीतील सर्व तज्ज्ञ स भासदांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने आणि शेतकरी बांधवांकडून अभिनंदन आणि पुढील काळासाठी शुभेच्छा !

अध्यक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र
हळदीचे गुणधर्म व उपयुक्ततेबाबतचा तपशील
हळदीचे फायदे
हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाची ७ उद्दिष्टे
हळद धोरणाची गरज
कृषी यंत्रसामग्रीचा वापर
हळद धोरण – एक सुचिन्तित उपक्रम

शेतीपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत : महाराष्ट्राच्या हळद उद्योगाला बळकटी
हळद ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये तिचं महत्त्व आहे. महाराष्ट्र हे हळद उत्पादनात अग्रगण्य राज्य असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मोठ्या प्रमाणावर हळद लागवड केली जाते. हळद संवर्धनासाठी सर्वांगीण धोरणात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्यामुळे, हळद संशोधन व प्रशिक्षण समितीने सखोल चर्चेनंतर ‘हळद धोरण’ प्रस्तावित केले आहे. हे धोरण उत्पादन, गुणवत्ता, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि जागतिक विपणन या सर्व क्षेत्रांत सुधारणा करून हळद शेतकऱ्यांच्या समृद्धीची हमी देण्याचा हेतू ठेवते. या उपक्रमाला कृषी, विपणन, अन्न, वैद्यकीय, आरोग्य आणि आयुष विभागांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठिंबा प्राप्त आहे.
हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाची ७ उद्दिष्टे
- हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना किफायतशीर, खात्रीशीर व व्यवहार्य तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे.
- हळद उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करुन त्याचे उत्पन्न दप्पट करणे व त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे.
- हळद लागवडीच्या आदर्श पद्धती तयार करणे.
- हळद काढणी, प्रक्रिया इ. बाबत सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या नवीन यांत्रिकीकरणासंदर्भात शिफारस करणे.
- हळद पॅकेजींग, विपणन, ब्रँडींग, निर्यात याकरिता बाजार साखळी विकसित करणे.
- वेगवेगळ्या योजनांचा कृति संगम (convergence) करुन शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे.
- हळद लागवड ते विपणनाच्या अनुषंगाने शेतकरी, प्रक्रियादार, निर्यातदार यांना येत असलेल्या समस्यांची सोडवणूक करणे.

हळद धोरणाची गरज
हळद हे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तथापि शेतकऱ्यांना त्याप्रमाणात आर्थिक लाभ मिळत नसल्याने हळदीच्या सर्वंकष विकासासाठी सर्व सहभागीदार यांनी पुढे येऊन हळद लागवडीपासून ते काढणी, प्रक्रिया व विपणनापर्यंत येणाऱ्या सर्व अडचणींचा विचार करून त्यावर उपाययोजना सुचविण्याकरिता हळद धोरणाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत हळद विपणन, निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा नगण्य सहभाग विचारात घेता हळद विपणन व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याकरिता धोरणाची आवश्यकता आहे. हळद लागवड, प्रक्रिया व विक्री या अनुषंगाने येत असलेल्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी होत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक, पणन विषयक व मसाला मंडळाच्या योजनांचा लाभ अभिसरणाद्वारे उपलब्ध करुन देणे; हळद उत्पादन, प्रक्रिया, निर्यात इ. बाबत कार्यरत सर्व संबंधित संस्थांच्या एकत्रित सहभाग, याअनुषंगाने येत असलेल्या समस्यांवर उपाय योजना करणे व त्याद्वारे सर्व संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वंकश हळद धोरणाची गरज निर्माण झालेली आहे.
हळद संशोधन व संरक्षण धोरणांतर्गत प्रस्तावित मुद्दे

- 1
हळद बियाणे / लागवड
- 2
हळद बियाणे बँक
- 3
तंतू सुधारणा प्रयोगशाळा
- 4
सेंद्रिय हळद लागवडसाठी माती व पाणी परीक्षण
- 5
पाणी संवर्धन आणि सिंचन व्यवस्थापन
- 6
कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी उपकरण बँक
- 7
हळद कापणी, हाताळणी आणि प्रक्रिया
- 8
हळद पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन
- 9
हळदचे विपणन, पॅकिंग, लेबलिंग आणि ब्रँडिंग
- 10
हळद उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर
- 11
हळदीतील भेसळ
- 12
हळदीवरील GST करप्रणाली
- 13
हळदीसंबंधित विस्तार सेवा
- 14
पिक विमा आणि आपत्ती व्यवस्थापन
- 15
कर्ज आणि आर्थिक सहाय्य
- 16
निधीची उपलब्धता

















