प्रोसेसिंग युनिट

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, द्वारा विकसित संसाधन कार्यक्षम हळद प्रक्रिया (Resource Efficient Turmeric Process (RETP) युनिट

पारंपारिक हळद प्रक्रिया ही वेळखाऊ, श्रम-केंद्रित आणि त्यामध्ये अस्वच्छता राहण्याची जास्त शक्यता असते. ही बाब विचारात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, यांनी संसाधन कार्यक्षम हळद प्रक्रिया तंत्र विकसित केलेले आहे. या पद्धतीमध्ये हळद स्वच्छ करणे, कंदाचे काप करणे, हवा विरहीत यंत्रामध्ये हळद शिजवणे, वाळविणे व पावडर करुन पॅकिंग करणे या बाबींचा समावेश आहे. या प्रक्रीयेमुळे कच्ची हळदीपासून पावडर हळद दोन दिवसात मिळवता येते, कमी श्रम व वेळेची बचत होते. हळदीचा दर्जा व गुणवता सुधारली जाते तसेच यामध्ये स्वच्छता व कुरकुमीनचे प्रमाण जास्त राखले जात असल्यामुळे हळदीस जादा दर मिळू शकतो. ही बाब विचारात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), पवई, यांचेद्वारे विकसित हळद प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्याच्या उपयुक्ततेनुसार वापर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

हळदीस बाजारात दर कमी असताना ती साठवण्याकरिता साठवणूकगृहांची तसेच शीतगृहांची उपलब्धता केल्यास जास्त दराच्या वेळी हळद विक्री करुन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होऊ शकेल. त्याकरिता साठवणूकगृह व शीतगृहांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. उद्योग विभागामार्फत हळद प्रक्रीयेसाठी जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या संदर्भात स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, स्टार्टअप यासारख्या वर्गांचा प्राधान्यक्रम ठरवून हळद उद्योगासाठी काही विशेष सवलती उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.