
हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी पंचवार्षिक धोरण आखणे प्रस्तावित असून धोरणाचा कालावधी सन २०२२ पासून सन २०२७ पर्यंत प्रस्तावित आहे. हळद उत्पादकांकरिता सर्व पायाभूत सुविधा उभारण्याचे धोरण असून हळद प्रक्रियादार, निर्यातदार यांच्याकडे देखील विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सदर धोरण कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल.



