आमच्याबद्दल

scintech

हळद पीक संशोधन, विकास तसेच त्या संलग्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था (Maharashtra Turmeric Research and Training Institute) कार्यरत आहे. सदर संस्था वसमत टी पॉईन्ट, मौजे बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली अथवा इतर शासकीय विभागाच्या जागेवर स्थापन होत आहे. सदर संस्थेद्वारे हळद पीक उत्पादन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळवून देणे; निर्यात संदर्भात उद्योगांना केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून अनुदानाचा लाभ मिळवून देणे यासंदर्भात शेतकऱ्यांची वैयक्तिक प्रकरणे योजना संबंधित विभागाकडे शिफारस करुन पाठविणे; हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका स्थापन करुन शेतकऱ्यांना हळद रोपे उपलब्ध करुन देणे; ऊती संवर्धन प्रयोगशाळेद्वारे रोप निर्मिती करणे; कीटकनाशक अवशेष, कु रकु मीन प्रमाण, जड धातू, सूक्ष्मजीव, पोषकतत्व आणि इतर घटकांसाठी गुणवत्ता चाचणी सुविधेची स्थापना करणे; कीड रोगांचे पूर्वानुमान करणारी ICT आधारित माहिती तंत्रज्ञान सुविधा तयार करणे; बदलत्या हवामानाचा पाऊसमान, पीक हंगाम, पिकांची वाढ व उत्पादन यांसारख्या बाबींवर होणारा परिणाम अभ्यासणे; विविध उद्योगांमध्ये हळदीस असलेला वाव, पुढील काळातील बाजारभाव, मागणी व हळद पुरवठा याबाबत Market intelligence Cell स्थापन करुन वरील बाबींचा अभ्यास व सर्वेक्षण करणे व त्याची माहिती हळद उत्पादकांस उपलब्ध करुन देण्यात येईल.

याप्रमाणे सदर संस्थेच्या माध्यमातून राज्यात मसाला पिकांसाठी सेंटर ऑफ एक्सलें स तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. हळद क्षेत्र वाढविण्याबरोबरच त्यासाठीच्या बाजार सुविधांचाही विकास होणे गरजेचे असल्याने प्रस्तावित हळद संशोधन व प्रशिक्षण संस्थेंमध्ये हळद उत्पादन समिती व मार्केटिंग समिती अशा दोन स्वतंत्र समित्या तयार करून त्यांच्याद्वारे हळद उत्पादन व मार्केटिंगबाबत काम करण्याचे धोरण आहे. हळद संशोधनामध्ये काम करणाऱ्या खाजगी संस्था व संशोधक यांच्या ज्ञानाचा वापर करुन घेणे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रात नवीन हळद संशोधन केंद्र सुरु करणे, त्याचबरोबरीने देशात विविध पिकांसाठी अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र संशोधन संस्थांप्रमाणे राज्यातील हळदीखालील क्षेत्र विचारात घेता स्वतंत्र हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठीही भारतीय कृषी संशोधन परीषद, नवी दिल्ली यांच्याकडे सदर प्रस्तावित संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. सदर संस्थेच्या नियमनासाठी राज्य शासन विधिमंडळ/ लोकसभा अथवा राज्यसभा सदस्य यांची अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन करेल तर प्रशासकीय नियमन, संशोधन याकरिता कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडील उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करण्यात येईल. याव्यतिरिक्त आवश्यक मनुष्यबळ कं त्राटी पद्धतीने उपलब्ध करुन घेण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.