हळद लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या

गुणवत्तापूर्ण व रोगमुक्त बियाणे

गुणवत्तापूर्ण-व-रोगमुक्त-बियाणे
हळदीच्या उत्पादनात गुणवत्तापूर्ण (अधिक कुरकुमीन असणारे) व रोगमुक्त बियाणे/लागवड साहित्य मिळणे ही महत्त्वाची बाब आहे. मातृकं दाद्वारे हळदीची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात बियाणे लागते व बियाण्याच्या वहनाचा खर्च देखील वाढतो. बियाणे घरचे नसल्यास त्यावरील खर्च देखील वाढतो. ऊती संवर्धन प्रयोग शाळेतील रोपे वेळेवर उपलब्ध नसणे तसेच शेतकऱ्यास स्वत: बियाणे उपलब्ध करावे लागणे.

प्रादेशिक हवामानानुसार निर्यात, प्रक्रिया, औषधे व सौदर्यंप्रसाधने इ. दृष्टीकोनातून आवश्यक वाणांची अनुप्लब्धता

प्रादेशिक-हवामानानुसार-निर्यात-प्रक्रिया
हळद पिकाच्या उपयुक्ततेनुसार/वापरानुसार विविध वाण विकसित होणे आवश्यक आहे. अधिक कुरकुमीन, ओलिओ रेझीन्स असलेल्या हळदीच्या जाती, प्रक्रियेकरिता योग्य असलेले हळदीचे वाण, सौंदर्य प्रसाधने, औषध निर्मितीकरिता योग्य असलेल्या हळदीच्या जाती विकसित करणे आवश्यक आहे.

अयोग्य लागवड पद्धती

practices
उत्कृष्ट हळद उत्पादनाच्या दृष्टीने हळदीचे एकात्मिक व्यवस्थापन के ले जात नाही. हळदीच्या योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जमीनीचा पोत सुधारणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे, गादीवाफा किंवा रुं द सरी वरंबा यावर लागवड करणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी देणे, कीड व रोगांचा प्रादर्भाव वेळीच आटोक्यात आणणे इत्यादी बाबी राबविणे आवश्यक आहे. पारंपारिक हळद लागवडीऐवजी सुधारित आदर्श लागवड पद्धतीने लागवड केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य आहे. त्याकरिता सर्व कृषी विद्यापीठे तसेच भारतीय मसाला पिके संशोधन संस्था यांच्याकडू न हळद लागवड आदर्श पद्धती निश्चित करुन घेणे आवश्यक आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान

निसर्गाच्या-लहरीपणामुळे-व-नैसर्गिक

हळद पिकास योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक आहे, बदलते हवामान त्यामुळे होणारी गारपीट, अवर्षण स्थिती, अती पाऊस, कीड रोगांचा प्रादर्भाव इ. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या सर्व बाबींचा विचार करुन हळद पिकास या सर्व घटकांपासून संरक्षण देण्यासाठी प्र भावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कंदमाशी, करपा व कंदकूज या कीड व रोगाचा वाढता प्रादर्भाव

ant_image
हळद पिकविणाऱ्या बहुतेक भागात कं दमाशी या किडीचा प्रादर्भाव दिसून येत आहे. या कीडीपासून 25 ते 30 टक्क्यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर हुमणी किडीचा प्रादर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. कं दकू ज या रोगाचा प्रादर्भाव पाणी निचरा न होणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कंदमाशी, करपा व कंदकूज या कीड व रोगाचे वेळेत एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. हळद काढणीनंतर पुढील वर्षाकरिता वापरावयाचे बियाण्यास बुरशीनाशाची बिजप्रक्रिया करुन ते ढीग पद्धत/खड् डा पद्धतीद्वारे साठविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, हळद बियाणे पेरण्यापुर्वी कं दकू ज रोगाच्या व्यवस्थापनाकरिता बुरशीनाशकांची बिजप्रक्रिया करणेही आवश्यक आहे.

सिंचन व्यवस्थापन

सिंचन-व्यवस्थापन

पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे तसेच उपलब्ध पाण्याच्या अकार्यक्षम वापरामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होतो. हळद पिकाच्या गरजेनुसार, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. कंदाची वाढ योग्य प्रकारे होण्याकरिता जमिनीतील पाण्याचे प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा कंदकुज या रोगाचा  प्रादर्भाव वाढू शकतो या बाबींचा विचार करता तुषार सिंचन किंवा पाटपाण्याचा वापर न करता ठिबक सिंचन, उपपृष्ठ भाग सिंचन पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे.

यांत्रिकीकरणाचा अभाव

यांत्रिकीकरणाचा-अभाव-1
हळदीमध्ये सर्वात क्लिष्ट गोष्ट म्हणजे काढणी व प्रक्रिया करणे होय. हळद पीक लागवड, भरणी, काढणी, काढणीपश्चात प्रक्रिया याकरिता शेतकरी यांत्रिकीकरणाचा पुरेसा अवलंब करत नाहीत, सद्यस्थितीत मजुरांची अनुप्लब्धता, वाढता मजुरी खर्च लक्षात घेता यांत्रिकीकरणाचा वापर करणे आवश्यक ठरते.

काढणी पश्चात अपुऱ्या प्रक्रिया व साठवणूक सुविधा

काढणी-पश्चात-अपुऱ्या-प्रक्रिया
हळद काढणी नंतर कच्च्या हळदीवर प्रक्रिया होईपर्यंत साधारणत: तीन ते चार आठवड्यांचा कालावधी जातो. तसेच सदर प्रक्रिया ही पारंपारिक पद्धतीने केल्यामुळे त्यातील कु रकु मीन तसेच नैसर्गिक घटाकांचा ऱ्हास होऊन हळदीचा दर्जा व गुणवत्ता घसरते. प्रक्रियेदरम्यान हे नैसर्गिक घटक कमी होऊ नये यासाठी सुधारित /आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हळद काढणी ते प्रक्रियेदरम्यानचा कालावधी कमी करणे, त्यासाठी लागणारे श्रम व खर्च कमी करणे तसेच कु रकु मीनचा ऱ्हास थांबविणे आवश्यक आहे. पारंपारिक पेव, ग्रामीण गोदाम, वेअर हाऊस, शीत साठवणूक गृह इत्यादी सुविधांची पुरेशा प्रमाणात असलेली अनुप्लब्धता.

विपणन

विपणन

हळद निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर येणारी प्रमुख अडचण म्हणजे हळदीतील जड धातू आणि रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांचे अंश, ते कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. हळद विपणन हे आज देखील बाल्यावस्थेत आहे. विपणनामध्ये मध्यस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे हळद उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. हळदीचा समावेश जीवनावश्यक वस्तुंमध्ये नसल्याने शासनामार्फत हळदीची किमान आधारभूत किं मत ठरवली जात नाही. एकू णच हळदीची किं मत ही तिच्या मागणी व पुरवठ्याच्या आधारे ठरवली जाते.

सद्यस्थितीत हळदीचे विपणन हे मध्यस्थांनी काबीज के ले असून हळद उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कं पनी अद्यापही हळद विपणनात उतरलेले नाहीत, परिणामी प्रत्यक्ष ग्राहक देत असलेल्या किं मतीमध्ये उत्पादकांचा हिस्सा हा खूपच कमी आहे. हळदीचे राज्यातील, देशातील व देशाबाहेरील बाजार हा मोठा आहे. देशाबाहेरील बाजारपेठांसाठी सर्वात मोठा पुरवठादार म्हणून भारताचे स्वामित्व अद्यापही अबाधित आहे.

हळदीच्या उपयुक्ततेनुसार औषधे, सौंदर्य प्रसाधने, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात व खाद्य उद्योगात हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने या विविध उद्योगांमध्ये हळदीस वाव आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडींगमध्ये नॅशनल कमॉडिटी एक्सचेंजवर हळदीचाही व्यापार होतो. हा व्यापार शेतकरी उत्पादक कं पनी करु शकते. तथापि अद्यापही हळद उत्पादक शेतकरी व कंपनी या बाजारात उतरले नाहीत यामुळे हळद उत्पादकांच्या मार्केटींग संदर्भात क्षमता बांधणी करणे गरजेचे आहे.

हळदीवरील ५ टक्के वस्तू व सेवा कर आकारणी

हळदीवरील-५-टक्के-वस्तू
शिजवून वाळवलेली व पॉलिश के लेली हळद हा शेतीमाल होऊ शकत नाही असे स्पष्ट करत महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने त्यावर ५ टक्के वस्तूव सेवा कराची (जीएसटी) आकारणी केली आहे. हळदीच्या आवक व परिणामी व्यापारावर मोठा परिणाम करणारा हा निर्णय आहे. हळदीवर जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे विपरित परिणाम हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. ओली हळद विक्रीकरिता मर्यादित प्रमाणात काही ठिकाणी बाजार सुविधा उपलब्ध आहे. ओल्या हळद विक्रीकरिता बाजार सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुण, वस्तूव सेवा कराची अडचण दर होऊ शकेल.

वित्तीय प्रोत्साहन व सुट

वित्तीय-प्रोत्साहन-व-सुट

हळद पिकाचे बियाणे, लागवड, प्रक्रिया यासाठी मोठ्याप्रमाणावर वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांमार्फत वेळेवर व नियमित वित्त पुरवठा होणे गरजेचे आहे. तसेच किसान क्रेडीट कार्डव कर्ज रक्कम सुलभतेने उपलब्ध व्हावी. बिनव्याजी भांडवल तसेच पतहमी मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, केंद्र व राज्य शासनाच्या मसाला पिकांसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजनांची सांगड घालून उत्पादकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

प्रशिक्षण व उत्पादकांचा विकास

प्रशिक्षण-व-उत्पादकांचा-विकास

केंद्र शासन व राज्यातील कृषी विद्यापीठे , राष्ट्रीय पातळीवरील पीक संशोधन संस्था, हळद उद्योजक, खाजगी हळद संशोधन संस्था इ. हळद पिकाशी संबंधित क्षेत्रामध्ये स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. या संसथांनी एकत्रितपणे हळद विकासासाठी काम करणे आवश्यक आहे. या संस्थांच्या माध्यमातून हळद पिकातील अद्यावत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण इ. बाबत हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे. त्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा, पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे, अद्यावत तंत्रज्ञान प्राप्त करणे, बाजार साखळी विकसित करणे यासाठी राज्यात, देशात व देशाबाहेर अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करुन त्यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे.