हळद धोरण

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर के ला जातो.

भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारतातील मसाले आणि मसाल्यांखालील पिकांच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे ६ टक्के क्षेत्रावर हळद पीक घेतले जाते. चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांग्लादेश मध्येही हळदीची लागवड केली जाते.जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारतात आहे जे ८१ टक्के आहे. त्यानंतर चीन (७ टक्के), म्यानमार (४ टक्के), नायजेरिया (३ टक्के), बांग्लादेश (३ टक्के), व्हिएतनाम (१ टक्के) आणि श्रीलंका (१ टक्के) यांचा क्रम लागतो.

भारतात हळद हे मसाला पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे भारतात सर्वदर हळदीची लागवड होऊ शकते. भारतात हळद प्रामुख्याने महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू , छत्तीसगड, आंध्रप्रदेश, इ. राज्यांत घेतली जाते. सन २०१९- २० मध्ये देशात हळद पिकाखाली एकू ण २.१८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ५४,८८५ हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात होते. सन २०२०-२१ मध्ये राज्यातील हळद पिकाखालील क्षेत्र वाढू न ६०,८४० हेक्टर झाले असल्याचे दिसून येते. सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र हे हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे.

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण

जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक असला तरी एकूण उत्पादनाच्या केवळ ६ टक्केनिर्यात केली जाते. सन २०२०-२१ मध्येभारतातून एकू ण ११६० मे. टन ताज्या हळदीची निर्यात करण्यात आली त्यात महाराष्ट्राचा ५१ टक्के हिस्सा आहे.

भारत आणि महाराष्ट्रातून ताज्या हळदीची निर्यात

अ.क् वर्ष भारत महाराष्ट्र महाराष्ट्राची टक्केवारी
साठा (मे.टन) मूल्य कोटी साठा (मे.टन) मूल्य कोटी
२०१५-१६ ५,०४४ ५१ ३,१४२ २८ ६२
२०१६-१७ १२,१३७ १०८ ५,४७३ ४९ ४५
२०१७-१८ ३,८५६ ३४ ५९७ १३ ३८
२०१८-१९ १६,१८३ १११ १,७७८ १६ १४
२०१९-२० ३,८८५ ३६ २,२१३ २७ ५७
२०२०-२१ १,१६० ५१० ५१

भारतातून एकूण मसाला आणि हळद पावडरची निर्यात साठा मे.टन/मूल्य कोटी

अ.क् वर्ष भारताची एकूण हळद निर्यात भारताची एकूण मसाला पिकांची निर्यात हळदीची टक्केवारी
साठा (मे.टन) मूल्य कोटी साठा (मे.टन) मूल्य कोटी
२०१५-१६ ८८,५०० ९२ ८,४३,२५५ १,६२४
२०१६-१७ १,१६,५०० १२४ ९,४७,७९० १,७८१
२०१७-१८ १,०७,३०० १०४ १०,२८,०६० १,७९८
२०१८-१९ १,३३,६०० १४२ ११,००,२५० १,९५०
२०१९-२० १,३५,००० १२२ ११,८३,००० २,१५१

सन २०१९ पासून भारतातील विविध खरेदी केंद्रावरील हळद आवक तपशील

सन 2019 पासून देशातील विविध बाजारपेठेतील हळदीची आवक पाहता महाराष्ट्राचा वाटा जवळपास 50 टक्के आहे. विशेषत: महाराष्ट्रातील वसमत, हिंगोली व नांदेड बाजारपेठे त देशातील एकूण हळदीची 34% आवक होत असल्याचे निदर्शनास येत असून ती देशात अव्वल स्थानावर आहे.

हळदीतील विविध गुणधर्मामुळे या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतो. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी हळद पिकांच्या महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे. यात सतत होणाऱ्या हळदीच्या दरामधील चढउतार, नियंत्रित बाजारपेठे चा अभाव, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, यांत्रिक पद्धतीने काढणीचा अभाव इत्यादी बाबींचा विचार करुन जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रक्रिया, साठवणूक व विक्रीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रातील हळद इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हळदीच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत आवश्यक सर्व सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

अ.क्र. केंद्राचे नाव २०१९ आवक (पोती संख्या लाखात) २०२० आवक (पोती संख्या लाखात) २०२१ आवक (पोती संख्या लाखात) २०२२ अपेक्षीत आवक* (पोती संख्या लाखात) २०२२
अपेक्षीतआव
(मे.टन)
बाजार पेठे तील प्रमाण %
बाजार पेठे तील प्रमाण % २७.०० २८.०० ३०.०० ३२.०० ३,०५,००० ३४.९२%
निजामाबाद/मेटपल्ली/गोलापल्ली २६.०० २५.०० २२.८० २२.०० १,४३,००० २३.४५%
सांगली/कोल्हापूर/जळगाव/धुळे १३.०० १६.०० १४.९० १५.०० ९७,५०० १५.२९%
इरोड/सालेम/म्हैसूर ९.०० ११.०० ७.९० ११.०० ७९,५०० ११.७३%
वारंगल/केसमुद्रम ४.२५ ४.५० ३.८० ३.९० २५,३२० ४.१६%
दग्गीराला/कृष्णा/गुंटूर ४.५० ३.०० २.४० २.४० १५,६०० २.५६%
कुड्डापाह/राजमपेट/कोदर १.५० १.५० १.०० १.४० ९,१०० १.४९%
पंजाब व गुजरात ०.७५ ०.५० १.२५ १.२५ ८,१२५ १.३३%
आसाम/मेघालय/अरुणाचल १.७५ १.५० १.२५ १.०० ६,५०० १.०७%
१० विकाराबाद/सदाशिवपेट/तंदर १.२५ १.५० १.०० ०.९० ५,८५० ०.९६%
११ दलसंगसराई/मुर्शिदाबाद १.७५ १.०० ०.९० ०.९० ५,८५० ०.९६%
१२ बिहार/ बेटिया/गुलाबबाग १.७५ १.०० १.०० ०.८० ५,२०० ०.८५%
१३ बरहामपूर/ओरिसा १.०० १.०० ०.७५ ०.७५ ४,८७५ ०.८०%
१४ अलेप्पी/कोचीन/के रळ ०.७५ ०.६० ०.४० ०.३० १,९५० ०.३२%
१५ राजमुंद्री ०.५० ०.४० ०.३० ०.२० १,३०० ०.२१%
एकूण पोती (संख्या लाखात) ९४.७५ ९६.५० ८९.६५ ९३.८० ६,०९,७०० १००%
हळद आवक (लाख मे.टन) ६.१६ ६.२७ ५.८३ ६.१०

हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या दि. २६.०२.२०२१, दि. ३१.०५.२०२१ व दि. १४.०९.२०२१, दि. १२.१०.२०२१, दि. ०४/१२/२०२१ रोजी बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकींच्या दरम्यान हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सर्व बाबींवर सखोल चर्चा होऊन खालीलप्रमाणे राज्याकरिता हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे.