भागधारकांच्या अपेक्षा

शेतकरीवर्गाच्या-अपेक्षा
  1. जास्त उत्पादन देणाऱ्या हळदीच्या प्रजाती निर्माण करणे.
  2. अद्ययावत, रास्त, स्विकारण्यायोग्य नवीनतम तंत्रज्ञानाची उपलब्धता होण
  3. निविष्ठांची सुलभ आणि वेळेवर उपलब्धता (प्रामुख्याने बियाणे, सिंचनासाठी पाणी, जैविक व रासायनिक खते, किटकनाशके इ.)
  4. कंदकूज व कंदमाशी यांना प्रतिकारक्षम वाणांची उपलब्धता
  5. हळदीतील कुरकुमीनच्या प्रमाणानुसार दराची खात्री, बाजार सुविधा
  6. पूर, अवर्षण व इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण
  7. सहज कर्ज उपलब्धता, हळद पिकाकरिता विमा समर्थन
  8. जमीन धारण क्षमता विचारात घेऊन छोट्या शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण सुविधा
  9. बाजाराभिमूख पीक नियोजन/उद्योजकता विकास
  10. विविध योजनांचा एक खिडकी तत्वावर लाभ
  11. हळद पिकाचा किमान आधारभूत किं मत अंतर्गत समावेश करण
हळद-द्योजक
  1. गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता/मूल्यवर्धन
  2. उत्पादन विशिष्ट वाण
  3. पुरवठ्यातील सुसंगतता
  4. बाजारात सुलभ प्रवेश
  5. साठवण सारख्या पायाभूत सुविधा
  6. औषधे/रसायने/रंग/सौंदर्यप्रसाधने उद्योगात हळदीचा वापर वाढविण
  7. निर्यात आणि बाह्य बाजारासाठी शासनाचा पुढाकार
customer
  1. वाजवी किं मतीत उच्च गुणवत्तेच्या सुरक्षित उत्पादनांची उपलब्धता
  2. कीटकनाशक/रसायन उर्वरित अंश तसेच भेसळ मुक्त हळद व हळद उत्पादन
  3. ग्राहकाच्या मागणीनुसार नवीन आणि नाविन्यपूर्ण हळद उत्पादने विकसित करण
  4. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे तील ग्राहकांच्या मागणीनुसार हळद उपलब्ध करणे
कृषी-विभाग
  1. हळद क्षेत्र विस्ताराचे दृष्टीने विस्तार यंत्रणेसाठी हळद आदर्श लागवड पद्धतीची उपलब्धता
  2. विकेल ते पिकेल याकरिता कृषी विभागासह विविध संशोधन संस्था, शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपन्या, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यासारख्या सर्व संबंधित संस्थांना एकत्रित करण्यासाठी व्यासपिठाची उपलब्धता.
  3. हळद पिकाच्या मूल्यसाखळी विकासातील सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकासाकरिता समन्वय घडविणे.
  4. हळद पिकाच्या मूल्यसाखळी विकासात आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणे.
  1. पायाभूत सुविधांच्या निर्मितीकरिता प्रथम प्राधान्य.
  2. पुरेशा मनुष्यबळासह संशोधन संस्थांचे बळकटीकरण करणे.
  3. संशोधन, शिक्षण, कौशल्य आणि तंत्रज्ञान, प्रदर्शन बळकटीकरणासाठी आर्थिक निधीची उपलब्धता
  4. हळद पिकातील नावीन्यपूर्ण संशोधन जसे मातीविना हळद लागवड, व्हर्टीकल पद्धतीने हळद लागवड
  5. कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी त्यासाठी कीड रोग प्रतिकारक जातीचे संशोधन करणे.
  6. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वातावरणात तग धरणाऱ्या हळदीच्या प्रजाती निर्माण करणे. तसेच जमीनीच्या पोतानुसार संशोधन करण
  7. कृषी विद्यापीठाकडील लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित क्षेत्रांच्या विस्तार यंत्रणा आणि इतर भागधारकांशी नियमित संवाद साधण्याकरिता व्यासपिठाची उपलब्धता.
  8. हळदीतील अधिक कुरकुमीन प्रमाण असणाऱ्या प्रजातींचा विकास करणे.
  1. बाजार पायाभूत सुविधा आणि बाजार केंद्रांचे जाळे मजबूत करणे.
  2. हळद निर्यात वाढविण्याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून उत्पादकांना प्रशिक्षण, विपणन, ब्रँडींग इ. करिता सहाय्य करणे.
  3. भौगोलिक मानांकनाकरिता पाठपुरावा करणे.
  4. निर्यात प्रोत्साहन योजना प्रस्तावित करुन राबविण.
  5. खरेदीदार विक्रेता संमेलन नियोजित करणे.
शासन
  1. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्य व आत्मविश्वास निर्माण करणे.
  2. उद्योजकांना विशेष सवलती उपलब्ध करुन देणे (उदा. विजबील, वस्तू व सेवाकर, अनुदान, प्रोत्साहन योजना इ.)
  3. राष्ट्रीय संघटनांसह सर्व भागधारकांमध्ये समन्वय ठेवणे.
  4. सेंद्रिय हळद शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करणे.
  5. हळद पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण
  6. हळद संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे.